ब्रीड
शुद्ध बोर सीमेन
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१. | शुद्ध बोर | १५०० रु. / कि | ३०००-३५०० रु. / कि |
बोअर शेळीपालनाबाबत
1) बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते. विल्यानंतरचे लहान नर करडाचे वजन 3 किलो, तर मादी करडाचे वजन 2.5 किलो असते. सात महिन्यांच्या नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो होते.
2) चांगले खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असेल, तर पहिल्या 12 महिन्यांत दररोज वाढीचा वेग 200 ग्रॅम असतो. त्यानंतर 270 दिवसांच्या दरम्यान 250 ग्रॅम प्रति दिन असा वाढीचा वेग असतो.
3) या शेळीचा गाभण काळ 148 ते 150 दिवसांचा असतो. 50 टक्के शेळ्या दोन करडे देतात. या शेळ्यांची वाढ जास्त असल्याने त्यांच्या वजन वाढीच्या प्रमाणात खाद्य द्यावे लागते. खाद्यामध्ये एक भाग सुका चारा, दोन भाग ओला चारा आणि खुराकही द्यावा लागतो.
4) शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी घटसर्प, ब्रुसेला, लाळ्या खुरकूत, पीपीआर या रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. लसीकरण पावसाच्या अगोदर करावे.
5) व्यवस्थापन चांगले असेल, तर बोअर जातीच्या शेळ्यांचे जिवंत वजनाच्या 50 टक्क्यांपर्यंत खाण्यायोग्य मटण मिळते.
सोजत
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१ . | सोजत | ५५० - ६५० रु. / कि | ५५० - ६५० रु. / कि |
सोजत शेळी ही मुख्यतः राजस्थान मध्ये आढळते. ही जात जमनापारी ची संकरित जात आहे. ह्या शेळी चं दूध उत्पादन कमी असल्यामुळे शक्यतो तिचा वापर मांसाहारासाठी केला जातो. बकरी ईद ला ह्या बकरी चा बळी दिला जातो.
जातीचे गुणधर्म
आकार (अंदाजे ) प्रौढ नर प्रौढ मादी
वजन (किलो) 50-60 40-50
लांबी (सेंमी ) 80 60
छाती घेर (सेंमी) 80 62
सिरोही
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१. | सिरोही | ३८० रु. / कि | ३८० रु. / कि |
सिरोही जातीच्या शेळ्या ह्या आकाराने सर्वसाधारण असतात. अंगावर काळ्या तपकिरी चट्टे पट्टे असतात. राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यात ह्या शेळ्या उगम आहे म्हणून या शेळ्यांना सिरोही शेळी असे म्हणतात. सिरोही या जाती मांसाव्यतिरिक्त दुधासाठी पाळल्या जातात
बारबरी
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१. | बारबरी | ---- रु / कि | ---- रु / कि |
बारबरी शेळी बारबरी शेळी ही अतिशय सुन्दर मध्यम बांध्याचि म्हणून प्रसिद्ध आहे रंगाने पांढरी व् त्यावर चॉकलेटी ठिपके तिची सुंदरता वाढवतात दिसायला ती हरणा सारखी दिसते. मुख्यत्वे ही शेळी ही अफ्रिकेतील बरबेरा सोमालिया येथील मूळ ब्रीड आहे भारतात ती उत्तर प्रदेश पंजाब आणि पाकिस्तान मध्ये आढळते. ही प्रजाति मांस उत्पादनासाठी पाळतात तिचे मांस हे उत्तम मानले जाते. ही शेळी लवकर वयात येण्यासाठी आणि तिळी पिल्लै देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही प्रजाति मध्यम बांध्याचि असून तिचे कान लहान वाकडे शिंग आणि वर आलेले डोळे तिच्या सौन्दर्यात भर घालतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्यात गुजरात मधील काही भागात पंजाब मधील झेलम आणि सर्गोंधा भागात आढळते.
जमुनापारी
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१. | जमुनापारी | ७००-७५० रु. / कि | ७००-७५० रु. / कि |
पंजाब, हरियाना, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागांत जमुनापारी या शेळीची जात आढळते. शुद्ध जातीच्या जमुनापारी शेळ्या इटावा जिल्ह्यात जमुना व चंबळ नदी यामधील भागात आढळतात. या जातीच्या शेळ्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. शेळ्या मुख्यतः पांढऱ्या रंगाच्या असतात. शरीराची ठेवण लांब व उंच असते. डोक्याचा अग्रभाग उठावदार असून, कान लांब लटकणारे असतात. नाक उठावदार असून त्यास "रोमन नाक' असे म्हणतात. चामडी मऊ, चमकदार असते. शिंगे चपटी, मागील बाजूस वळलेली असतात. ही शेळी दोन वर्षांतून तीनदा पिल्लांना जन्म देते. जमुनापारी शेळ्यांना जसे हवामान लागते, तसे आपल्याकडे नाही, त्यामुळे शेळीपालन व्यवसायासाठी आपल्याकडील वातावरणात या शेळ्यांचे संगोपन योग्यरीत्या होऊ शकत नाही. या शेळ्यांऐवजी जालना भागात उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करणे जास्त फायदेशीर ठरू शकेल.
सानेन
अनु.क्र | प्रकार | नर किमत | मादी किमत |
१. | सानेन | ३००० - ३५०० रु. / कि | ३००० - ३५०० रु. / कि |
सानेन या जातीची शेळी जर घेतली, तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याकरता 'सानेन' जातीची शेळी वरदान ठरली आहे